बांदा शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातांचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन…!
⚡बांदा ता.०३-: बांदा शहरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या विविध नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातांचे भव्य मिरवणूकीने व ढोल ताशांच्या गजरात तेरेखोल नदीपात्रात काल (गुरुवार) सायंकाळी उशीरा विसर्जन करण्यात आले. शहरात गांधीचौक, कट्टा कॉर्नर, आळवाडी, निमजगा येथे नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दुर्गामातांचे पूजन करण्यात आले होते. गेल्या ९ दिवसात विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिला…
