Headlines

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक संपन्न

संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांनी केले मार्गदर्शन *💫कुडाळ दि.२७-:* शिवसेना सदस्य नोंदणी अभियान १ ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना कार्यकारिणीची बैठक सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याबाबत…

Read Full News

क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाजाच्या दिनदर्शिकेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते प्रकाशन

*💫कुडाळ दि.२७-:* क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज महाराष्ट्र,विभाग -सिंधुदुर्ग या समाजाचा लेखाजोखा मांडणारी तसेच समाजाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याचा आलेख मांडणाऱ्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सूर्यकांत घाडी, केंद्रीय समिती सदस्य विजय गावकर, विलास गावकर, युवा अध्यक्ष उमेश घाडीगावकर उपस्थित होते.

Read Full News

पंचायत समितीची मासिक बैठक मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न….

तालुक्यातील विविध रखडलेल्या कामकाजावर चर्चा *💫सावंतवाडी दि.२७-:* तालुका पंचायत समितीची मासिक बैठक सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी तालुक्यातील विविध रखडलेल्या कामकाजावर चर्चा करून त्यांचा आढावा जाणून घेण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, आरोग्य, अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्यांन कडून तालुक्यातील प्रलंबित राहिलेल्या कामांचा…

Read Full News

मुळदे येथे उद्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. नितीन सावंत करणार मार्गदर्शन *💫कणकवली दि.२७-:* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग व उद्यानविद्या महाविद्यालय, मूळदे सिंधुदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मुळदे येथे उद्या २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्यशेती व शोभिवंत मासे व्यवसाय संधी’ या विषयावर…

Read Full News

संविधानात सर्वांगीण विकासासाठी मुलभूत हक्कांची तरतूद : न्यायाधीश पाटील

*💫वेंगुर्ला दि.२७-:* भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे व व्यापक असून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मुलभूत हक्कांची तरतूद केली आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वे विषद केली आहेत. घटनादुरुस्तीच्या तरतूदीमुळे आणखी आवश्यक व योग्य त्या हक्कांची भर पडत आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश वि.।द..पाटील यांनी संविधान दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. शिक्षण प्रसारक…

Read Full News

माध्यमिक विद्यालय पोखरणला थर्मल गॉन ऑक्सिमीटर व सॅनिटायझर प्रदान

सन-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांतर्फे वाटप *💫कणकवली दि.२७-:* माध्यमिक विद्यालय पोखरणच्या सन-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांनी थर्मल गन, ऑक्सिमीटर व सॅनिटायझर प्रदान केले. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची तपासणी करूनच प्रवेश द्यावयाचा असल्याने वरील साहित्याची महत्त्वपूर्ण गरज लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी मदत करण्याचे आवाहन शाळेतर्फ़े करण्यात आले होते. शाळेने केलेल्या या आवाहनास प्रतिसाद देत शाळेच्या एससी २००० बॅचच्या विद्यार्थ्यांनी थर्मल…

Read Full News

“त्या” खड्ड्यामुळे शिरोडा नाक्यांवर अपघात…

महिला किरकोळ जख्मी सावंतवाडी नगरपालिकेला आता तरी येणार का जाग…? *💫सावंतवाडी दि.२७-:* शहरातील शिरोडा नाक्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एका महिलेच्या गाडीला अपघात होऊन ती किरकोळ जख्मी झाली आहे. सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या अनेक रस्त्यांवर असे खड्डे पडले असून नगरपालिका मात्र सुशेगात आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे वारंवार होणारे अपघात पाहता आता तरी नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का…?…

Read Full News

बंदुकीची गोळी लागुन तरुणाचा जागीच मृत्यू

*हळदीचे नेरूर येथील घटना *💫कुडाळ दि.२६-:* बिगर परवाना बंदुक घेऊन शिकारीच्या उद्देशाने घराशेजारील जंगलात गेलेल्या हळदीचे नेरूर येथील युवराज वारंग (१८) या तरुणाचा बंदुकीची गोळी लागुन जागीच मृत्यू झाला. आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास युवराज वारंग घरा शेजारील जंगलात बिगर परवाना बंदुक घेऊन शिकारीच्या उद्देशाने गेला होता. यावेळी काही वेळाने मोठ्याने बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला…

Read Full News

सावंतवाडी नगरपालिका निर्जंतुकीकरणासाठी उद्या बंद

*नागरिकांनी सहकार्य करण्याचे मुख्याधिकारी यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.२६-:* नगर परिषदेचे कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्याचा प्रादुर्भाव शहरात होऊ नये यासाठी नगरपालिकेत उद्या शुक्रवारी २७ नोव्हेंबर रोजी निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याने पालिकेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेतील कर्मचारी हे पॉझिटिव्ह आल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता विचारात घेता तत्काळ त्यावर…

Read Full News

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी बिहारी युवकावर गुन्हा दाखल….

*💫मालवण दि.२६-:* मालवण धुरीवाडा येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी जंगबहादूर प्रसाद (वय २०, रा. बिहार) या युवकाविरोधात मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्या अल्पवयीन मुलीच्या आईने मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी मुलीचे आई वडील नांदगाव येथे आपल्या नातेवाईकाच्या बाराव्या दिवसाच्या कार्यासाठी गेले होते. यावेळी मुलीने…

Read Full News

You cannot copy content of this page