महिला किरकोळ जख्मी सावंतवाडी नगरपालिकेला आता तरी येणार का जाग…?
*💫सावंतवाडी दि.२७-:* शहरातील शिरोडा नाक्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एका महिलेच्या गाडीला अपघात होऊन ती किरकोळ जख्मी झाली आहे. सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या अनेक रस्त्यांवर असे खड्डे पडले असून नगरपालिका मात्र सुशेगात आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे वारंवार होणारे अपघात पाहता आता तरी नगरपालिका प्रशासनाला जाग येणार का…? असा प्रश्न सावंतवाडीतील नागरिकांन मधून विचारला जात आहे.