माध्यमिक विद्यालय पोखरणला थर्मल गॉन ऑक्सिमीटर व सॅनिटायझर प्रदान

सन-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांतर्फे वाटप

*💫कणकवली दि.२७-:* माध्यमिक विद्यालय पोखरणच्या सन-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांनी थर्मल गन, ऑक्सिमीटर व सॅनिटायझर प्रदान केले. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची तपासणी करूनच प्रवेश द्यावयाचा असल्याने वरील साहित्याची महत्त्वपूर्ण गरज लक्षात घेऊन माजी विद्यार्थ्यांनी मदत करण्याचे आवाहन शाळेतर्फ़े करण्यात आले होते. शाळेने केलेल्या या आवाहनास प्रतिसाद देत शाळेच्या एससी २००० बॅचच्या विद्यार्थ्यांनी थर्मल गन, ऑक्सिमीटर व सॅनिटायझर आदी साहित्य शाळेस प्रदान केले. यावेळी विजय गुरव, रूपेश तायशेटे उपस्थित होते. पोखरण पंचक्रोशीत या बॅचचे अभिनंदन होत आहे. या बॅचचा आदर्श इतर बॅचनी घ्यावा व शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page