*💫वेंगुर्ला दि.२७-:* भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे व व्यापक असून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मुलभूत हक्कांची तरतूद केली आहे. तसेच मार्गदर्शक तत्त्वे विषद केली आहेत. घटनादुरुस्तीच्या तरतूदीमुळे आणखी आवश्यक व योग्य त्या हक्कांची भर पडत आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश वि.।द..पाटील यांनी संविधान दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ल्याच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा प्राधिकरण वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या अॅड.श्रीशा कुलकर्णी (सावंतवाडी) यांनी भारतीय संविधनातील मुलभूत हक्क व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती दिली. तर प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी संविधान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. या ऑनलाईल चर्चासत्रास राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा.वसिम सय्यद यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्रा.प्रदिप होडावडेकर, सूत्रसंचालन व स्वागत प्रा.डॉ.आनंद बांदेकर तर आभार प्रा.विवेक चव्हाण यांनी मानले. या चर्चासत्राच्या सुरुवातीला २६/११ मधील मुंबई हल्ल्यात शहिद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी व तसेच निष्पाप नागरिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदश्री चव्हाण, प्रा.विनोद पवार, प्रा. विरेंद्र देसाई, प्रा. वामन गावडे यांनी सहकार्य केले.
संविधानात सर्वांगीण विकासासाठी मुलभूत हक्कांची तरतूद : न्यायाधीश पाटील
