मुळदे येथे उद्या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. नितीन सावंत करणार मार्गदर्शन

*💫कणकवली दि.२७-:* जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग व उद्यानविद्या महाविद्यालय, मूळदे सिंधुदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मुळदे येथे उद्या २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. मत्स्यशेती व शोभिवंत मासे व्यवसाय संधी’ या विषयावर उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. नितीन सावंत, मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन सत्राचा पालक व विद्यार्थी मित्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास सिंधुदुर्ग सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या लवतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page