तालुक्यातील विविध रखडलेल्या कामकाजावर चर्चा
*💫सावंतवाडी दि.२७-:* तालुका पंचायत समितीची मासिक बैठक सभापती मानसी धुरी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी तालुक्यातील विविध रखडलेल्या कामकाजावर चर्चा करून त्यांचा आढावा जाणून घेण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे, आरोग्य, अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती सदस्यांन कडून तालुक्यातील प्रलंबित राहिलेल्या कामांचा जाब विचारण्यात आला आहे. यावेळी ग्राम सडक योजना पूर्ण करण्यासाठी कोरोना या आजारामुळे कामगार मिळत नसल्याने ती कामे खोळबली असल्याचे मत मांडले आहे. तर लघु पाटबंधारे विभागात सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तीन तालुक्यांचे काम एकाच इंजिनिअर असून त्यांना देखील कामगार मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. असे मत त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडले आहे. यावेळी आरोग्य प्रश्नांवरून पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी आक्रमक भूमिका मांडत मळगाव गावात मोठ्या प्रमाणत दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून मृत्यु संख्या देखील वाढत आहेत. परंतु आरोग्य विभाग योग्य अशी उपाययोजना करत नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याचा धोका असल्याने वेळीच आरोग्य विभागाने लक्ष घालून उपाययोजना करावी अशा सूचना दिल्या आहेत.