*💫कुडाळ दि.२७-:* क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज महाराष्ट्र,विभाग -सिंधुदुर्ग या समाजाचा लेखाजोखा मांडणारी तसेच समाजाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याचा आलेख मांडणाऱ्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सूर्यकांत घाडी, केंद्रीय समिती सदस्य विजय गावकर, विलास गावकर, युवा अध्यक्ष उमेश घाडीगावकर उपस्थित होते.