Headlines

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी पालकमंत्री व आमदार

मनसे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांची घणाघाती टीका *💫मालवण दि.३०-:* एकीकडे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करत रॅम्प उध्वस्त करणाऱ्या कर्तव्यदक्ष तहसीलदारांना दमदाटी करणाऱ्या विरोधात तक्रार करूनही जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार हे कोणतीही दखल घेत नाहीत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी न राहता वाळू व्यावसायिक, भ्रष्टाचार करणारे ठेकेदार, सरकारी कामात व्यत्यय आणणाऱ्या व्यक्ती तसेच बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या…

Read Full News

मळगाव येथून बेपत्ता झालेली सोनुर्ली येथील ती महिला सापडली

*💫सावंतवाडी दि.३०-:* काल मळगाव येथून बेपत्ता झालेली सोनुर्ली येथील महिला सौ. श्रुती सत्यवान मसुरकर ( वय २५) ही सापडली असून, आज ती स्वतः हुन पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. त्यानंतर तिच्या नातेवाईकांशी पोलिसांनी संपर्क साधत त्या महिलेस नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. याबाबतची माहिती पोलिस शरद लोहकरे यांनी दिली आहे.

Read Full News

सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणी अध्यक्षपदी हेमंत मराठे यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.३०-:* मळेवाड – सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” च्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणी अध्यक्षपदी हेमंत रमाकांत मराठे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२० रोजी भटवाडी, सावंतवाडी येथील वि. स. खांडेकर विद्यालयाच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात…

Read Full News

जनतेमधील तीव्र असंतोष आणि जनभावना जिल्हा प्रशासन स्तरावर मांडण्यासाठी मनसेचे लक्षवेधी जन आंदोलन….

जनतेने सहभागी होण्याचे मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे आणि सचिव राजेश टंगसाळी यांचे आवाहन *💫कुडाळ दि.३०-:* राज्यकर्त्यांच्या बेजबाबदार कारभारविरोधात जनतेमध्ये तीव्र असंतोष आहे. हा असंतोष व जनभावना जिल्हा प्रशासन स्तरावर मांडण्यासाठी मनसेने ३ डिसेंबर रोजी लक्षवेधी जन आंदोलन पुकारले आहे. जनतेनेही या आंदोलनात उत्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव…

Read Full News

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी युवक ताब्यात

*तक्रारीनंतर १ तासात लावला पोलिसांनी मुलीचा शोध *💫सावंतवाडी दि.३०-:* तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला आज तालुक्यातील मोतेस फेद्रू रोड्रिक्स रा.शेर्ले या युवकाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसात दाखल करताच एका तासात पोलिसांनी धडक कारवाई करत पोलिसांनी त्या युवकासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. असून संबंधित मुलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा…

Read Full News

शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदी प्रशांत कोठावळे यांची नियुक्ती

*💫सावंतवाडी दि.३०-:* शिवसेना प्रणीत महाराष्ट्र राज्य माथाडी जनरल कामगार संघटनेच्या सरचिटणीस पदी सावंतवाडीतील प्रशांत कोठावळे यांची निवड मा. शिवसेना पक्षप्रमूख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानूसार संघटनेचे महाराष्ट्र राज्यअध्यक्ष निलेश उर्फ आप्पा पराडकर यांनी केली त्याबाबतचे नियुक्ती पत्र पराडकर यांनी त्यांना दिले. ह्या प्रसंगी हिंदभारतीय जनरल कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस घनःशाम नाईक, माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष…

Read Full News

प्रसिद्ध उद्योजक कृष्णा पालयेकर यांचे निधन

*💫दोडामार्ग दि.३०-:* तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि भंडारी समाजाचे तालुकाध्यक्ष तसेच लाकूड व्यापारी संघटना दोडामार्ग चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पालयेकर यांचं रविवारी रात्री गोवा बांबुळी येथे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दोडामार्ग परिसरात शोककळा पसरली आहे.

Read Full News

पाडलोसमध्ये रस्त्यावर दहाफुटी मगर….

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण; पाळीव जनावरांना धोका; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी *💫बांदा दि.२९-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.1 जवळ दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी एका महाकाय आठ ते दहा फुटी मगरीचे दुचाकीस्वारास दर्शन झाले. केणीवाडा येथे मे महिन्यामध्ये वनविभागाच्या हातातून निसटलेली ती मगर हिच तर नव्हे ना, अशा भितीदायक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी…

Read Full News

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्या प्रकरणी डिगस येथील युवक ताब्यात

*💫कुडाळ दि.२९-:* कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला डिगस राणेवाडी येथील संशयित संभाजी ऊर्फ आनंद अशोक राणे, वय. २५ याला कुडाळ पोलिसांनी मोठ्या शिथाफिने ताब्यात घेण्यात अखेर यश मिळवले आहे. डिगस येथील घरी आला असताना या संशयिताला त्याच्या राहत्या घरातूनच पहाटे ५ वा.तर या अल्पवयीन मुलीला सावंतवाडी परिसरातून…

Read Full News

युवराज वारंग मृत्यू प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती कुडाळ प्रतिनिधी:- हळदीचे नेरूर येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या युवराज वारंग (१८) या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी आता काही महत्त्वाचे धागे दोरे हाती लागणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. युवराज याच्या गोळी लागुन मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी युवराज याच्याबरोबर शिकारीसाठी…

Read Full News

You cannot copy content of this page