कुडाळ पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली माहिती
कुडाळ प्रतिनिधी:- हळदीचे नेरूर येथील जंगलात शिकारीसाठी गेलेल्या युवराज वारंग (१८) या युवकाचा गोळी लागून मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी आता काही महत्त्वाचे धागे दोरे हाती लागणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. युवराज याच्या गोळी लागुन मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी युवराज याच्याबरोबर शिकारीसाठी अन्य काही जण गेले असण्याची शक्यता वर्तवली होती. याबाबत पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी सांगितले की, या प्रकरणी तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणी काही महत्त्वाचे धागे दोरे हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही अहवाल अजुन यायचे असुन ते आल्यानंतरही काही गोष्टी स्पष्ट होणार असल्याचे कोरे यांनी सांगितले.