*💫कुडाळ दि.२९-:* कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेला डिगस राणेवाडी येथील संशयित संभाजी ऊर्फ आनंद अशोक राणे, वय. २५ याला कुडाळ पोलिसांनी मोठ्या शिथाफिने ताब्यात घेण्यात अखेर यश मिळवले आहे. डिगस येथील घरी आला असताना या संशयिताला त्याच्या राहत्या घरातूनच पहाटे ५ वा.तर या अल्पवयीन मुलीला सावंतवाडी परिसरातून दुपारी ताब्यात घेण्यात आले. आता लैगिंग शारिरीक सबंध ठेवल्या प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. कुडाळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला दि.१३ नोव्हेंबर २०२० रोजी सायं.७.३० वा.चे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेलेबाबत फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली होती. फिर्यादीवरुन प्रथम एका अज्ञात युवकावर कुडाळ पोलिसात फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. य पोलिस तपासात या अल्पवयीन मुलीला संशयित संभाजी ऊर्फ आनंद अशोक राणे, वय. २५ , रा. डीगस, राणेवाडी ता. कुडाळ याने पळवून नेल्याचे निष्पन्न झाले.यावरून त्याला दि.२९ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वा. चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले. या मुलाचे वडीलाचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. मात्र १३ नोव्हेंबर पासून बेपत्ता असलेला युवक वडिलांच्या निधनानंतर तिसर्या दिवशीच्या विधीसाठी घरी आला होता. याची माहिती पोलिसांना लागताच या युवकाला त्यांच्या घरातून पहाटे ५ वा. ताब्यात घेतले.त्याचेकडे चौकशी करता अपहृत मुलगी ही सावंतवाडी शहरात असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर तपासीक अंमलदार सपोफौ डी. ए. डीसोजा व पोका एस. आर. तांबे यांनी स्टाफसह सावंतवाडी येथे जाऊन अपहृत मुलीला सावंतवाडी नगरपरिषद परिसरातून ताब्यात घेतले व कुडाळ पोलीस ठाण्यात आणले . त्यानंतर अपहृत मुलगी हीचेकडे पोलीस उपनिरीक्षक आर. डी. गोरड यांनी चौकशी केली असता संभाजी ऊर्फ आनंद अशोक राणे, वय. २५ वर्षे, रा. डीगस, राणेवाडी ता. कुडाळ याने या मुलीशी व शारीरीक संबंध ठेवल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार नमुद गुन्ह्यात भा.दं.वि. कलम ३७६(२)(एन), बालकांचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण अधि.२०१२ चे कलम ४, ५ ( एल), ६, ८, १२ ही वाढीव कलमे लावण्यात आलेली असून या गुन्ह्याचा पुढील तपास वेंगुर्ले पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक आर. डी. गोरड या करत आहेत. या मुलीला फुस लाऊन पळवून नेल्या नंतर संबंधित युवक हा पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर धार्मिक विधीसाठी घरी आलेला हा युवक पोलिसांना सापडला.
अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्या प्रकरणी डिगस येथील युवक ताब्यात
