Headlines

किल्ले स्पर्धेत कुडाळ येथील जीवन कुडाळकर ग्रुप प्रथम

युवा फोरम इंडियातर्फे आयोजन *💫कुडाळ दि.०२-:* युवा फोरम इंडियातर्फे दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले स्पर्धेत कुडाळ येथील जीवन कुडाळकर ग्रुप कुडाळ यांचा प्रथम क्रमांक आला तर द्वितीय क्रमांक बाल गणेश कला क्रीडा मंडळ वेंगुर्ला यांचा व तृतीय क्रमांक प्रथमेश सावंत आणि ग्रुप मालवण यांचा आला. आपली मराठमोळी संस्कृती जपण्यासाठी व गड-किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी युवा फोरम संस्थेच्या…

Read Full News

पिंगुळी ते पाट रस्त्यावरील खड्डे आठ दिवसात भरा-:अतुल बंगे

*💫कुडाळ दि.०२-:* पिंगुळी ते पाट रस्त्याची चाळण झालेली आहे या रस्त्यावरील डागडुजी करण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करूनही कामाला सुरुवात होत नाही आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून गप्प होतो यापुढे लोकांना होणारा त्रास सहन करणार नाही रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा पुढील होणा-या परीणामास सज्ज रहावे असा इशारा…

Read Full News

जिल्ह्यात एकूण ४ हजार ९३१ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या २२० वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 931 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

जिल्हा बॅंकेला अ दर्जा मिळाला आहे तो जिल्हालाच नव्हे तर राज्याला भूषणावह

*जिल्हा बॅक चेअरमन सतीश सावंत यांनी केले स्पष्ट *💫सिंधुदुर्गनगरी,दि.०२* जिल्हा बँकेने बेकायदेशीर नोकरभरती केली नाही असे स्पष्टीकरण करत जिल्हा बॅंकेला पुन्हा अ दर्जा मिळाला आहे तो जिल्हालाच नव्हे राज्याला भूषणावह आहे, असे जिल्हा बॅकेचे चेअरमन सतिश सावंत यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याचबरोबरआतापर्यत 16/17 मधील कर्ज दिले होते ,यातील 300 जणांवर 101 ची कारवाही केली…

Read Full News

घरपट्टीमध्ये समाविष्ठ स्वच्छता कर जनतेकडून वसूल करू नये

*शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांजवळ निवेदनाद्वारे मागणी *💫कुडाळ दि.०२-:* कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील घरपत्रक उतारा यामध्ये स्वच्छता कर नागरपंचायतीमार्फत समाविष्ठ करण्यात आलेला आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे आधीच जनता आर्थिकदृष्ट्या हतबल झालेली आहे. त्यामुळे अशा कराच्या सक्तीमुळे जनतेला आर्थिक भुर्दंड पडणार आहे.त्याच प्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी प्रत्येक खात्या अंतर्गत स्वच्छता कर जनतेकडून वसूल करण्यात येऊ…

Read Full News

आंबोली पोलिस पाटलांच्या विरोधात २१ डिसेबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील आंबोली पोलिस पाटील यांच्या विरोधात २१ डिसेबर रोजी ११ वाजता आंबोली येथील कृष्णा खापरे, लक्ष्मण गावडे, गणपत पाटील, यशवंत सावंत हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन वरील चारही व्यक्तीनी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना मंगळवारी दिले आहे. या निवेदनात आंबोली जकातवाडी येथील पेट्रोल पंप समोर…

Read Full News

शिरवंडे येथे महिला शेतीशाळेचा शुभारंभ

*सुनिल घाडीगावकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ *💫मालवण दि.०२-:* शिरवंडे येथे तालुका कृषि अधिकारी, मालवण यांचे मार्गदर्शनाखाली महिला शेतीशाळेचा शुभारंभ पंचायत समिती सदस्य श्री.सुनिल घाडीगावकर यांचे उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कृषि विकास योजनेतुन बचत गटातील महिलांना चवळी बियाण्याचे वाटप करण्यात आले. कृषि पर्यवेक्षक श्री.सचिन गवंडे यांनी बचत गटातील महिलांना चवळी लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली. तसेच…

Read Full News

मसुरे देऊळवाडा वेताळटेंब येथील विन्या या नकलाकाराचे जीवन वार्धक्यामुळे कठीण

*💫मालवण दि.०२-:* मसुरे देऊळवाडा वेताळ टेंब येथील विनायक विष्णू परब उर्फ़ विन्या या नकलाकाराचे जीवन वयाच्या ७० व्या वर्षी वार्धक्यामुळे कठीण झाले आहे. तो आजच्या घडीला उतारवयमुळे तसेच काहीशा आजारामुळे बेजार अवस्थेत जीवन कंठत आहे.या व्यक्तीला आयुष्यात बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागले होते. वयाच्या दहा ते पंधराव्या वर्षांतच आईवडिलांचे छत्र हरपल्याने खऱ्या अर्थाने विन्या पोरका…

Read Full News

शेतविहिरीत पडलेल्या रानडुक्कराला वनविभाग आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून जीवनदान

*💫मालवण दि.०२-:* मालवण तालुक्यातील सुकळवाड पाताडेवाडी येथील शेतविहिरीत पडलेल्या रानडुक्कराला जीवदान देण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले.कृष्णा पाताडे यांच्या जुन्या शेतविहिरीत काल दुपारी विहिरीला कठडा नसल्याने रानडुक्कर पडल्याचे निदर्शनास येताच पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी वनविभागाला याची कल्पना दिली. वनविभागाचे कर्मचारी येईपर्यंत रानडुक्कर विहिरीत सतत पोहत असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्याने पकडून विश्रांती दिली….

Read Full News

जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यातील बारा केंद्र प्रमुखांना त्यांच्या मागणी नुसार प्राथमिक शिक्षण विभागाने ‘सरल’ प्रणालीचे एक दिवशीय प्रशिक्षण मंगळवारी दिले आहे.शासनाने शिक्षण संबंधी सर्व माहिती ऑनलाईन घेण्यास सुरुवात केलेली आहे. यासाठी ‘सरल’ प्रणाली ही वेबसाइट विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये शिक्षकांना आपली दैनंदिन माहिती भरावी लागते. विद्यार्थी, शिक्षक व शाळा संबंधी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने सरल…

Read Full News

You cannot copy content of this page