Headlines

सामाजिक कार्यकर्ते रवी राऊळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महारक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६१ रक्तदात्यानी केले रक्तदान* *💫कुडाळ दि.१०-:* दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील रवी राऊळ यांच्या ४५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत रवी राऊळ मित्रमंडळ आणि प्रकाश मोर्यें मित्रमंडळ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली १० वर्ष हा उपक्रम दोन्ही मंडळे राबवत आहेत. या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यानी रक्तदान केले आहे….

Read Full News

युवतीच्या विनयभंगप्रकरणी भटवाडी येथील युवकावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

*💫सावंतवाडी दि.१०-:* तालुक्यातील एका २१ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी भटवाडी येथील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री उशिरा भटवाडी परिसरात घडली. दरम्यान याठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी संबंधित संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बाळकृष्ण प्रकाश चव्हाण (३१, मूळ रा. माडखोल (सध्या. भटवाडी) असे त्याचे नाव आहे. संबंधित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस…

Read Full News

जिल्ह्यात एकूण ५ हजार ५९ जण कोरोना मुक्त….

*सक्रीय रुग्णांची संख्या २९३ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ५९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जाऊन करणार जनजागृती

*कसाल न्यु इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यशाळेत पोलिस अधीक्षक दाभाडे यांचे प्रतिपादन* *💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* महिला व बालकांवरील लैगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार कार्यशाळेत केले. ९ डिसेंबर रोजी सकाळी कसाल हाय…

Read Full News

भाजप नेते खासदार नारायण राणे मुळेच नारायण राणे….

पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांचा शिवसेनेच्या नारायण उर्फ बबन राणे यांना जोरदार टोला* *💫सावंतवाडी दि.१०-:*  शिवसेनेच्या नारायण उर्फ बबन राणे यांनी पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांना आमने सामने येऊन विकास कामे दाखवण्याचे आवाहन दिले होते. यावर आज सभापती मानसी धुरी यांनी आज सावंतवाडी शहरातील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत त्याला प्रतिउत्तर दिले आहे. …

Read Full News

अपघातात गंभीर जख्मी झालेल्या निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे निधन

*💫सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी आगाराचे निवृत्त मॅकेनिक विष्णु राणे यांचे काल रात्री उपचार सुरू असताना निधन झाले आहे. दोन दिवसापूर्वी कारीवडे येथे झालेल्या अपघातात ते गंभीर जख्मी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू असताना काल त्यांचे निधन झाले. सावंतवाडी आगारातून ते ३ महिन्यापूर्वीच निवृत्त झाले होते. याबाबतची माहिती त्यांचे पुतणे दत्ता राणे यांनी…

Read Full News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कै. देवेंद्र पडते यांना वाहण्यात आली आदरांजली

रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी व्यक्त केले दुःख* *💫कुडाळ दि.१०-:* शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र पडते (२८) यांचे नुकतेच गोवा मणिपाल येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अकाली दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने कुडाळ शहरात शोककळा पसरली असून, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…

Read Full News

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पुत्रशोक

कुडाळ : कुडाळ येथील रहिवासी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र संजय पडते (२८) याचे नुकतेच गोवा मणिपाल येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा तो एकुलता एक मुलगा होता. देवेंद्र पडते याच्या मृत्यूने कुडाळ शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.देवेंद्र याची अंतः…

Read Full News

कुडाळमधील उद्योजकाचे आर्थिक देवघेवीतून अपहरण ?

पोलिसांच्या जागृकतेमुळे अपहरणकर्ते गोवा फोंडा येथे ताब्यात *💫कुडाळ दि.०९-:* कुडाळ एमआयडीसी येथून एका उद्योजकाला अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला. कुडाळ पोलिसांनी जलदगतीने केलेले प्रयत्‍न यामुळे यातील अपहरण केलेल्या व्यक्तीसह तीन व्यक्तींना एका गाडीसह फोंडा येथे पकडण्यात यश आले आहे. हे अपहरण आर्थिक देवघेव मधून झाले असल्याची चर्चा आहे मुळ मुंबई व सध्या कुडाळ तालुक्तात…

Read Full News

नृत्य परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राहुल कदम जिल्हाध्यक्ष तर महेश जांभोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड *💫कुडाळ दि.०९-:* नृत्य परिषदेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राहुल दत्तात्रय कदम यांची नृत्य परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी तर महेश जांभोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नृत्य परिषदेच्या राज्य स्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हि निवड जाहीर करण्यात आली. राज्यभरातील नृत्य कलाकारांना एकत्र करून त्यांचे…

Read Full News

You cannot copy content of this page