कुडाळ : कुडाळ येथील रहिवासी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांचा मुलगा देवेंद्र संजय पडते (२८) याचे नुकतेच गोवा मणिपाल येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा तो एकुलता एक मुलगा होता. देवेंद्र पडते याच्या मृत्यूने कुडाळ शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.देवेंद्र याची अंतः यात्रा दुपारी १२.३० वाजता कुडाळ बाजारपेठ येथील निवासस्थानातून निघणार आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांना पुत्रशोक
