Headlines

महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जाऊन करणार जनजागृती

*कसाल न्यु इंग्लिश स्कूल येथे आयोजित कार्यशाळेत पोलिस अधीक्षक दाभाडे यांचे प्रतिपादन*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* महिला व बालकांवरील लैगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार कार्यशाळेत केले.

९ डिसेंबर रोजी सकाळी कसाल हाय स्कुल येथे विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग पोलीस दलासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे, सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंखे, सायबर सेल सहायक पोलीस उपनिरीक्षक सुतार, पोलीस उपनिरीक्षक जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, मुख्याध्यापक गुरुनाथ कुसगावकर, विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले, जिल्ह्यातील महिला व बालकां वरील लैंगिक अत्याचार रोहण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रत्येक शाळेत कार्यशाळा घेऊन जनजागृती केली जाणार आहे. संध्या गावडे यांनी बाल लैगिक अत्याचार व शोषण याबाबतची माहिती दिली. सुतार यांनी सोशल मीडियावर होणारे लैंगिक अत्याचार याबाबतची माहिती देऊन त्यावर काय उपाययोजना करावी याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

You cannot copy content of this page