Headlines

मोती तलाव अस्वच्छ करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात नगरपालिका प्रशासन आक्रमक

*तलावात कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचा इशारा* *💫सावंतवाडी दि.१५-:* शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावात काही बेजबाबदार व असंस्कृत , विघ्नसंतोषी लोक मोती तलावात कचरा टाकून स्वच्छतेच्या उपक्रमात अडथळे निर्माण करत आहेत. या विरोधात नगरपालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या संबंधितांवर या पुढे दंड…

Read Full News

शहरात शहराबाहेरील टेम्पो रिक्षाना बंदी घाला…

*टेम्पो रिक्षा चालक मालक संघटनेची मागणी* *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी शहरा बाहेरील असणाऱ्या रिक्षा टेम्पो सावंतवाडी शहरात नको अशी मागणी टेम्पो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, ही मागणी मान्य न झाल्यास बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. वारंवार शहरात बाहेरील गाड्या फिरत असल्याने स्थानिक लोकांच्या धंद्यावर त्याचा परिणाम…

Read Full News

मळगाव-मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव १८ रोजी

*💫सावंतवाडी दि.१५-:* मळगाव येथील गर्द वनराईत असलेल्या जागृत श्री देवी मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार १८ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या…

Read Full News

आजगाव-मळेवाड श्री सावरदेवाचा वार्षिक उत्सव १७ रोजी

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा *💫सावंतवाडी दि.१५-:* आजगाव-मळेवाड येथील जागृत देवस्थान श्री सावरदेवाचा वार्षिक उत्सव गुरुवार १७ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा होणार आहे. या निमित्त सकाळी ब्राह्मणांकडून लघुरुद्र अभिषेक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रम झाल्यावर सकाळपासून. तीर्थप्रसाद वाटप होणार आहे. मात्र ह्या वर्षी कोरोनामुळे महाप्रसाद होणार नाही. तरी सर्व…

Read Full News

कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक तरुण ठार, तर तीन जख्मी….

*तिन्ही जख्मी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल.. *💫कणकवली दि.१४-:* मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे तवेरा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला आहे. तर या अपघातात तीन प्रवासी जख्मी झाले आहेत. तवेरा कार मधून ८ प्रवासी गोवा ते कोल्हापूर असा प्रवास आज करत असताना आज पहाडे साडेपाच च्या दरम्याने हा अपघात झाला आहे. गोवा…

Read Full News

कोकणातील वॉटर स्पोर्ट्स होणार तीन दिवसात सुरू

खासदार नारायण राणे यांचा पुढाकार बंदर मंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन *💫मालवण, दि.१५-:* कोकणातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय बंद असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी राज्याचे बंदरमंत्री अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधत वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत मागणी केली. येत्या तीन दिवसात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची कार्यवाही…

Read Full News

*मळगाव ग्रामपंचायत प्रशासका विरोधात अपील दाखल….

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार करण्यात आले अपिल दाखल;ग्रामपंचायत कर्मचारी हरिश्चंद्र आसयेकर यांनी केले अपील…* *💫सावंतवाडी दि.१४-:* मळगांव ग्रामपंचायतीचे कर्मचारी हरिश्चंद्र आसयेकर यांचे माहे नोव्हेंबरचे वेतनाचे धनादेश पंचायतीचे सचिव यांनी काढून प्रशासकांच्या सहीला ठेवले असता गेले 10 दिवस झाले तरी त्यावर सही करण्यात आलेली नाही. याबाबत मळगांव प्रशासक हे पंचायतीचे कॅशबुक व वर्गीकरण अपुर्ण असल्याचे…

Read Full News

महामार्गावरील अशुद्ध मराठी असलेले दिशादर्शक फलक तात्काळ बदलून मराठीची विटंबना थांबवा

मराठी भाषा प्रेमींची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गाचे काम चालु झाल्यापासून आतापर्यंत स्थानिक जनता, लोकप्रतिनिधी आदींनी कामाच्या दर्जावरून वेळोवेळी टीका केली आहे. तसेच यासंदर्भात आंदोलनेही झाली. आता महामार्गावर दिशादर्शक तसेच मार्गदर्शक सूचनांचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांमधील मराठी व्याकरणाच्या अक्षम्य चुकांची भर दिलीप बिल्डकॉन…

Read Full News

ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गची कार्यकारणी जाहीर

जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष पदी संतोष नाईक तर सचिव पदी किशोर नाचणोलकर यांची निवड* *💫मालवण दि.१४-:* ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकरणीच्या अध्यक्षपदी श्री . संतोष नाईक, तर सचिवपदी श्री . किशोर नाचणोलकर यांची निवड करण्यात आली. जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन…

Read Full News

वेत्ये येथील कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

*💫सावंतवाडी दि.१४-:* वेत्ये येथील जागृत श्री देव कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या मंगळवार १५ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून कलनाथ देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, पूर्वी देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक सोशल…

Read Full News

You cannot copy content of this page