*तलावात कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांचा इशारा*
*💫सावंतवाडी दि.१५-:* शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावात काही बेजबाबदार व असंस्कृत , विघ्नसंतोषी लोक मोती तलावात कचरा टाकून स्वच्छतेच्या उपक्रमात अडथळे निर्माण करत आहेत. या विरोधात नगरपालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली असून, अशा प्रकारे कृत्य करणाऱ्या संबंधितांवर या पुढे दंड आकारून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आरोग्य सभापती अँड परिमल नाईक यांनी दिला आहे. मोती तलाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेत नागरिकांनी देखील सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मोती तलावात कचरा करणे किंवा अशा प्रकारचे गैर कृत्य करत असताना कोणीही आढळून आल्यास त्याचा फोटो काढून त्वरित नगर प्रशासनाच्या भ्रमणध्वनी क्रमांक ८००७३३०४०४/७७४४९४६५१४ वर संपर्क साधून याबाबत माहिती द्यावी जेणेकरून त्या संबंधितावर त्वरित कारवाई करता येईल असे आवाहन अँड परिमल नाईक यांनी केले आहे.
