झाराप तीठा येथील जागा
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* झाराप तिठा येथे मुंबई गोवा महामार्ग लगत आपल्या मालकीच्या जमिनित हायवे बाधीत असलेली दुसऱ्याची इमारत पाडून आमची जागा मोकळी करून दया. या मागणीसाठी लक्ष्मीकांत सामंत यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात येथील रवींद्र सामंत यांच्या मालकीची जमीन बाधित झालीआहे. या जमिनीत अन्य व्यक्तीची इमारत आहे. ही इमारत सुद्धा महामार्ग रुंदीकरण कामात बाधीत झाली आहे. या इमारतीचा व जमिनीचा मोबदला शासनाकडून देण्यात आलेला आहे. तरीही संबंधित इमारत अद्याप पाडण्यात आलेली नाही. संबंधित इमारत मालकाने सदर इमारत पाडण्यासाठी आपली सहमती दर्शविली असल्याचे शासनाला लेखी पत्र दिलेले असतानाही ही इमारत पाडण्यासाठी शासनाकडून चालढकल केली जात आहे .त्यामुळे संबंधित इमारती मागील भागात असलेली मूळ जमीन मालकाची जमीन उपयोगात आणता येत नाही. तरी हायवे साठी बाधित झालेली व मागील जमिनीला अडसर ठरणारी सदर इमारत हटवून आमची जमीन मोकळी करून द्या . या मागणीसाठी झाराप येथील लक्ष्मीकांत सामंत, लक्ष्मी सामंत, सोनाली खानोलकर ,श्यामसुंदर खानोलकर ,सिद्धेश खानोलकर ,यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करून यापुढे आत्मदहन आंदोलन करावे लागेल. असा इशारा उपोषणकर्ते लक्ष्मीकांत सामंत यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे.
