बांदा येथे सिंधुदुर्गातील पहिल्या प्रदूषणविरहित विद्युतदाहिनीच लोकार्पण

*व्यापारी संघ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून लोकार्पण

*💫बांदा,दि.१५-:* सिंधुदुर्गातील पहिल्या प्रदूषणविरहित विद्युतदाहिनीच लोकार्पण बांदा स्मशानभूमीत आज व्यापारी संघ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात आले. यामुळे वेळेची व लाकडाची बचत होणार आहे. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, अंकिता देसाई, किशोरी बांदेकर, उमांगी मयेकर, रिया आल्मेडा, समीक्षा सावंत, स्वप्नाली पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, राजेश विर्नोडकर, जावेद खतीब, व्यापारी संघाचे खजिनदार मंगलदास साळगावकर, सतीश येडवे, सुनील धामापूरकर, संजय सावंत, सुभाष शिरोडकर, अभय सातर्डेकर आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर बांदा ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविली आहे. यामुळे वेळेची व लाकडाची बचत तसेच प्रदूषण देखील कमी होणार आहे. केवळ २ तासात दहन प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी केवळ १० टक्‍के लाकडे वापरण्यात येणार आहेत, असं यावेळी अक्रम खान यांनी सांगितले.

You cannot copy content of this page