*टेम्पो रिक्षा चालक मालक संघटनेची मागणी*
*💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी शहरा बाहेरील असणाऱ्या रिक्षा टेम्पो सावंतवाडी शहरात नको अशी मागणी टेम्पो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, ही मागणी मान्य न झाल्यास बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. वारंवार शहरात बाहेरील गाड्या फिरत असल्याने स्थानिक लोकांच्या धंद्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याची भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
