मळगाव-मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव १८ रोजी

*💫सावंतवाडी दि.१५-:* मळगाव येथील गर्द वनराईत असलेल्या जागृत श्री देवी मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार १८ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात भव्य पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री मळगाव येथील स्थानिक दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहभागी व्हावे, असे आवाहन मळगाव ग्रामस्थ, मानकरी व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page