आजगाव-मळेवाड श्री सावरदेवाचा वार्षिक उत्सव १७ रोजी

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा

*💫सावंतवाडी दि.१५-:* आजगाव-मळेवाड येथील जागृत देवस्थान श्री सावरदेवाचा वार्षिक उत्सव गुरुवार १७ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम पाळून साधेपणाने साजरा होणार आहे. या निमित्त सकाळी ब्राह्मणांकडून लघुरुद्र अभिषेक व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. धार्मिक कार्यक्रम झाल्यावर सकाळपासून. तीर्थप्रसाद वाटप होणार आहे. मात्र ह्या वर्षी कोरोनामुळे महाप्रसाद होणार नाही. तरी सर्व भाविकांनी शासनाचे नियम पाळून तीर्थप्रसाद व दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आजगाव -मळेवाड येथील ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page