*💫सावंतवाडी दि.१४-:* वेत्ये येथील जागृत श्री देव कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या मंगळवार १५ डिसेंबर रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी मंदिरात धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून कलनाथ देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे, पूर्वी देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक सोशल डिस्टन्स पाळून काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री जय हनुमान दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवात मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहभागी व्हावे, असे आवाहन वेत्ये येथील देवस्थानचे मानकरी व देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
वेत्ये येथील कलेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या
