ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गची कार्यकारणी जाहीर

जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष पदी संतोष नाईक तर सचिव पदी किशोर नाचणोलकर यांची निवड*

*💫मालवण दि.१४-:* ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकरणीच्या अध्यक्षपदी श्री . संतोष नाईक, तर सचिवपदी श्री . किशोर नाचणोलकर यांची निवड करण्यात आली. जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संघटनेच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासद यांच्यासाठी माध्यमिक शिक्षक पतपेढी नाचणे रत्नागिरी येथील सभागृहात आयोजित केलेल्या”मानवाचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये” या विषयांवरील कार्यशाळा रत्नागिरी येथे पार पाडली. या कार्यक्रमास ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन चे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक श्री. घनशाम सांडीम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सभासदांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर स्थानिक पातळीवर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन या समस्या सोडविल्या जातील काही समस्या बाबतीत स्थानिक पातळीवर मार्ग न निघाल्यास वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन दिले. प्रसंगी राज्य मानवी हक्क आयोग यांचेकडे याचिका दाखल करून काही प्रकरणात दाद मागितली जाईल. तसेच संघटनेने दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणी संदर्भात माहिती दिली. श्री. केदार नाईक सातारा जिल्हा संपर्क प्रमुख व ग्राहक पंचायत राज्य समिती सदस्य यांनी ग्राहकांचे हक्क व मानवाधिकार या विषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास श्री. भालचंद्र निंबकर जिल्हा निरीक्षक सातारा तालुका व विविध क्षेत्रातील मान्यवर जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , विविध पक्षाचे पदाधिकारी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अंकलगी यांनी केले. श्री.अरुण मोर्ये यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास पेजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले .

You cannot copy content of this page