*मळगाव ग्रामपंचायत प्रशासका विरोधात अपील दाखल….

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार करण्यात आले अपिल दाखल;ग्रामपंचायत कर्मचारी हरिश्चंद्र आसयेकर यांनी केले अपील…*

*💫सावंतवाडी दि.१४-:* मळगांव ग्रामपंचायतीचे कर्मचारी हरिश्चंद्र आसयेकर यांचे माहे नोव्हेंबरचे वेतनाचे धनादेश पंचायतीचे सचिव यांनी काढून प्रशासकांच्या सहीला ठेवले असता गेले 10 दिवस झाले तरी त्यावर सही करण्यात आलेली नाही. याबाबत मळगांव प्रशासक हे पंचायतीचे कॅशबुक व वर्गीकरण अपुर्ण असल्याचे कारण पुढे केले आहे. आसयेकर यांनी खात्री केली असता ५ महीन्याच वर्गीकरण अपुर्ण असून कॅशबुक नुकतच पुर्ण केले ही बाब निर्देशनास आली. खरे पहाता पंचायतीच्या जमा -खर्चाची ही स्थिती असेल तर ही गंभीर बाब असून वरिष्ठ कार्यालयातील तपासणी करणारे अधिकारी काय करतात ? असा मुद्दा उपस्थित होतो .तसेच माहे जुलै २०२० पासुन वर्गीकरण अपुर्ण असेल तर मळगांव ग्रा.पं.प्रशासक यांनी पदभार स्विकारल्यापासून जवळ जवळ ४ महीने झालेत मग त्यांची जबाबदारी काय ? असा मूद्दा उपस्थित करुन आपली आर्थिक पिळवणूक करुन मानसिक त्रास दिल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार अपिल दाखल केले आहे. अशा प्रकारे प्रशासकाविरोधात अपील दाखल करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

You cannot copy content of this page