कोकणातील वॉटर स्पोर्ट्स होणार तीन दिवसात सुरू

खासदार नारायण राणे यांचा पुढाकार बंदर मंत्री अस्लम शेख यांचे आश्वासन

*💫मालवण, दि.१५-:* कोकणातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय बंद असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी राज्याचे बंदरमंत्री अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधत वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत मागणी केली. येत्या तीन दिवसात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन शेख यांनी राणे यांना दिले आहे. कोरोना संक्रमनणामुळे इतर व्यवसायांबरोबर कोकणातील पर्यटन व्यवसायास मोठ्या प्रमाणात फटका बसला. अनेक तरुणांनी बँकांची कर्जे काढून पर्यटन व्यवसाय सुरू केला. अशा परिस्थितीत ऐन पर्यटन हंगामात मेरिटाईम बोर्डाने जलक्रीडा व्यवसायावर बंदी घातल्याने पर्यटन व्यवसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली असताना मेरिटाईम बोर्डाने जलक्रीडा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देत बंदर विभागामार्फत कारवाई करण्यास सुरुवात केल्याने पर्यटन व्यवसाय अडचणीत आला आहे. या प्रश्ना संदर्भात खासदार नारायण राणे यांनी मेरिटाईम बोर्डाचे मुख्याधिकारी, प्रधान सचिव यांच्याशी संपर्क साधत कोकणातील वॉटर स्पोर्ट्सला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्याला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर रात्री राणे यांनी बंदरमंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा केली. पर्यटनाच्या दृष्टीने वॉटर स्पोर्ट्स सुरू होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांना आवश्यक परवानग्या देत कोकणातील वॉटर स्पोर्ट्स तत्काळ सुरू करावेत असे सांगितले. त्यानुसार येत्या दोन-तीन दिवसात वॉटर स्पोर्ट्सला रीतसर परवानगी दिली जाईल, असे आश्वासन शेख यांनी राणे यांना दिले.

You cannot copy content of this page