मालवण रेवतळे भागात पार्किंग कारला अपघात….

सुदैवाने जीवित हानी टळली_ *💫मालवण दि.०३-:* मालवण रेवतळे भागात रस्त्याच्या बाजूला उभ्या करून ठेवण्यात आलेल्या एका कारला समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्याने दोन्ही कारचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की ठोकणारी कार रस्त्यावर पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार मालवण रेवतळे भागातील चंडिका मांडनजीक श्री. व्ही.जी…

Read More

*आजगाव येथील भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू

*तर तीन जण गंभीर जख्मी* *💫सावंतवाडी दि.०३-:* तालुक्यातील आजगाव वाघबीळ येथे भीषण अपघात घडला असून, या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तीन गंभीर जख्मी झाले आहेत. एका भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने चार दुचाकींना धडक दिल्याने हा अपघात घडला असून, या अपघाताची माहिती मिळताच शिरोडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Read More

जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचा पुढाकाराने बांदा शहरात स्थावर मालमत्ता नोंदणीसाठी सीटी सर्वेक्षण….

*💫बांदा दि.०३-:* बांदा शहरातील मालकी हक्काच्या स्थावर मालमत्तेच्या नोंदणीसाठी शहरात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने सिटी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांनी आज बांदा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अक्रम खान यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड संदर्भात माहिती मिळावी यासाठी मंगळवार दिनांक १६ रोजी सकाळी साडेदहा वाजता शहरातील नागरिकांच्या…

Read More

चिंदर आचरा माळरानावर लागलेल्या आगीत आंबा काजूबाग जाळून खाक…

लाखो रुपयांचे नुकसान *💫मालवण दि.०३-:* चिंदर- आचरा येथील माळरानावरील बागेत बुधवारी भर दुपारी अचानक गवताला लागलेल्या आगीमुळे पाच आंबा व काजू कलमांच्या बागा भस्मसात झाल्या आहेत या आगीत नामदेव पांगे, मायकल फर्नाडिस, दत्ताराम मिराशी,बाबाजी गांवकर, अरविंद गावकर यांचा आंबा कलम बागा तसेच काजूच्या बागा जळून खाक झाल्याने सुमारे सुमारे अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले. दरम्यान…

Read More

प्रदेश भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन

*स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे जिल्हा संयोजक बाळ पुराणिक यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.०३-:* महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी च्या सांस्कृतिक सेलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हा स्तरावर आणि अंतिम फेरी राज्य स्तरावर होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही फेरी ९ फेब्रुवारी रोजी…

Read More

भालचंद्र बाबांच्या नामाचा जयघोष दुमदुमला…

भल्या पहाटेपासून भक्तीचा मळा फुलवत जन्मोत्सव सोहळा साजरा;सायंकाळी पालखी मिरवणूक ; रात्रीच्या दैनंदिन आरतीने होणार सांगता *💫कणकवली दि.०३-:* असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ११७ व्या जन्मोत्सवाचा प्रमुख दिवस.समाधी स्थळी आकर्षक ‘नयनमनोहर’ अशी सजावट करण्यात आली होती. पहाटे नित्यपूजेने बाबांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली.कोरोनाच्या काळात हि अबालवृद्धाच्या उपस्थितीत  सकाळी पहाटे काकड आरती पासूनच हजेरी लावली.भालचंद्र…

Read More

माजी नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश ठरणार महत्त्वाचा *💫दोडामार्ग दि.०३ सुमित दळवी-:* मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले दोडामार्गचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अमित सामंत व ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांच्या उपस्थितीत त्यांना प्रवेश देण्यात आला. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री.ठाकूर यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.भविष्यात यांना संधी मिळण्याची शक्यता आहे….

Read More

संजू परब यांनी सावंतवाडीत बसून दोडामार्गच्या विकासावर बोलू नये…

बाबुराव धुरी यांची नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टीका *💫सावंतवाडी दि.०३-:* आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यास जशास तस उत्तर देऊ, सावंतवाडीत बसून दोडामार्गच्या विकासावर बोलू, नये असा पलटवार दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी लगावला. यावेळी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,‌ अशोक दळवी, बाबु कुडतरकर, मायकल डिसोझा, सुरेंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.

Read More

तिलारी घाटमाथ्यावर वीजनिर्मिती साठी जाणारी पाण्याची लाईन फुटली…

*💫दोडामार्ग दि.०३ सुमित दळवी-:* तिलारी वीजनिर्मिती प्रकल्पासाठी जाणारी पाण्याची लाईन तिलारी घाट माथ्यावर फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी यांच्या निदर्शनास आणून तात्काळ पाणी बंद करावे ही मागणी केली. यावेळी उदय जाधव व दत्ताराम देसाई यांनी दगड लावून पाणी दरीच्या बाजूने सोडले त्यामुळे रस्त्यावर…

Read More

सावंतवाडी संगीत सभेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

श्री चंद्रकांत घाटे मित्रमंडळ व केशवसुत कट्टा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन *💫सावंतवाडी दि.०३-:* ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक कै. स्व. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ सलग १६ व्या वर्षी श्री चंद्रकांत घाटे मित्रमंडळ व केशवसुत कट्टा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुलकर हायस्कूलच्या कै. सौ. लक्ष्मीबाई विष्णुपंत परुळकर सभागृहात संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. संगीत सभेला…

Read More
You cannot copy content of this page