चिंदर आचरा माळरानावर लागलेल्या आगीत आंबा काजूबाग जाळून खाक…

लाखो रुपयांचे नुकसान

*💫मालवण दि.०३-:* चिंदर- आचरा येथील माळरानावरील बागेत बुधवारी भर दुपारी अचानक गवताला लागलेल्या आगीमुळे पाच आंबा व काजू कलमांच्या बागा भस्मसात झाल्या आहेत या आगीत नामदेव पांगे, मायकल फर्नाडिस, दत्ताराम मिराशी,बाबाजी गांवकर, अरविंद गावकर यांचा आंबा कलम बागा तसेच काजूच्या बागा जळून खाक झाल्याने सुमारे सुमारे अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले. दरम्यान चिंदर आचरा येथील स्थानिक ग्रामस्थ आचरा पोलीस यांनी जीव धोक्यात घालून दाखवलेल्या प्रसंगावधानाने लागलेली आग आटोक्यात आली. बुधवारी दुपारी 12 वा. च्या सुमारास चिंदर आचरा माळरानावर अचानकपणे आग लागली जोरदार वाऱ्यामुळे आणि वाढलेल्या सुक्या गवतामुळे आगीन रौद्ररुप धारण केले, आग चिंदर आचरा माळरानावर पसरत चालली होती. ग्रामस्थांना समजताच डॉ. राजेश भोसले,आचरा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस उपनिरीक्षक शामराव काळे,विनायक साटम,सुशांत पुरळकर,अनिकेत सावंत, समीर लब्दे आचरा येथील ग्रामस्थ दिनेश कांबळी,गणेश शामरा,सुनील पवार तसेच चिंदर येथील ग्रामस्थ संतोष चव्हाण, विकास गावडे, दत्तात्रय जाधव, किशोर कांबळी,शानु गावडे,भरत वराडकर ,बाबू खरात अन्य ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

You cannot copy content of this page