जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचा पुढाकाराने बांदा शहरात स्थावर मालमत्ता नोंदणीसाठी सीटी सर्वेक्षण….

*💫बांदा दि.०३-:* बांदा शहरातील मालकी हक्काच्या स्थावर मालमत्तेच्या नोंदणीसाठी शहरात जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाच्यावतीने सिटी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक डॉ. विजय वीर यांनी आज बांदा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अक्रम खान यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड संदर्भात माहिती मिळावी यासाठी मंगळवार दिनांक १६ रोजी सकाळी साडेदहा वाजता शहरातील नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक प्रियदा साकारे, निमतानदार भालचंद्र सावंत, भूकरमापक रवींद्र चव्हाण, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामविस्तार अधिकार डी. एस. अमृतसागर आदी उपस्थित होते. १६ रोजी ग्रामपंचायत सभागृहात होणाऱ्या बैठकीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून शंका निरसन करावे असे आवाहन सरपंच खान व डॉ. विर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page