मालवण रेवतळे भागात पार्किंग कारला अपघात….

सुदैवाने जीवित हानी टळली_

*💫मालवण दि.०३-:* मालवण रेवतळे भागात रस्त्याच्या बाजूला उभ्या करून ठेवण्यात आलेल्या एका कारला समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्याने दोन्ही कारचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. ही धडक एवढी जबरदस्त होती की ठोकणारी कार रस्त्यावर पलटी झाली सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार मालवण रेवतळे भागातील चंडिका मांडनजीक श्री. व्ही.जी खोत यांची होंडा कंपनीची चार चाकी रस्त्याच्या कडेला उभीकरून ठेवण्यात आली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एका निळ्या रंगाच्या कारणे उभ्या करून ठेवलेल्या कारला जोरदार धडक दिली. या धडकीमुळे दोन्ही गाड्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून गाड्यांचे दर्शनी भागाची नुकसानी मोठी झाली आहे. सुदैवाने ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी रस्त्यावर कुणीही नव्हते नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. या अपघाताची नोंद मालवण पोलीस स्थानकात नव्हती. हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात आल्याची चर्चा सुरू होती. अपघाता नंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. फोटो: मालवण रेवतळे येथे दोन कारमध्ये अपघात झाल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

You cannot copy content of this page