*💫देवगड दि.०३-:* पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्येतून दारूच्या नशेत वाडा परबवाडा येथील अरूण शामराव परब(४०) या इसमाने काजुच्या झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना आज बुधवार सायंकाळी ४ वा.सुमारास उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वाडा परबवाडा येथील अरूण शामराव परब यांनी वाडा अलम सडा या ठिकाणी काजुच्या फांदीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या दारूच्या नशेत केली असल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे. आज सायंकाळी ४ वा.सुमारास तेथील रहिवासी रामकृष्ण परब यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मयत अरूण परब यांचा पुतण्या निमेश प्रमोद परब व वाडा पोलिस पाटील यांना याबाबत माहिती दिली. याबाबत निमेश परब यांनी देवगड पोलिस स्टेशनला खबर दिली. यावेळी स.पो.निरिक्षक संजय कातिवले यांच्यासह दशरथ चव्हाण, आगा, पोलिस नाईक प्रशांत जाधव यांनी घटनास्थळी येत मृतदेहाचा पंचनामा केला आहे. परंतु अजूनही आत्महत्येबाबत निश्चित कारण समजू शकले नाही आहे. तर अधिक तपास पोलिस नाईक प्रशांत जाधव करीत आहेत.
दारूच्या नशेत वाडा परबवाडा येथील तरुणाची आत्महत्या
