निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश ठरणार महत्त्वाचा
*💫दोडामार्ग दि.०३ सुमित दळवी-:* मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले दोडामार्गचे नगरसेवक रामचंद्र ठाकूर यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अमित सामंत व ज्येष्ठ नेते सुरेश दळवी यांच्या उपस्थितीत त्यांना प्रवेश देण्यात आला. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री.ठाकूर यांचा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.भविष्यात यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र खडपकर यांनी देखील आपल्या नेतृत्वाखाली तेजस्विनी जाधव, मेघा जाधव, प्रगती कांबळे, संगिता वगैर, अलका जाधव, रामेश्वरी जाधव, अर्जुन जाधव, दत्ताराम जाधव, प्रसाद जाधव, दत्ताराम विष्णू जाधव, भगवान जाधव, नारायण जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत शहरात मनसेला खिंडार पाडले आहे. यावेळी जिल्हा नियोजन सदस्य बाळा कनयाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदिप चांदेलकर, दिपक जाधव, संदिप गवस, संदेश वरक, बाबा खतिफ, कृष्णा नाईक, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर,अणावकर, राजगुरू, बावतीस फर्नाडिस आदी उपस्थित होते.
