⚡सावंतवाडी,ता.२०-: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सावंतवाडी तालुका स्तरावरील महत्त्वाची बैठक उद्या, २१ तारखेला सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी कामाची दिशा आणि पक्ष बांधणीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार असून, तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी केले आहे.
