कणकवली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कलमठ च्या वतीने २२ व २३ एप्रिल २०२६ रोजी किड्स समर कॅम्प २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम मालती नेचर रिसॉर्ट, जानवली येथे पार पडणार आहे.
२२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत फनी गेम्स, सायं. ७ ते ८ या वेळेत कळसूत्री बाहुल्यांचे सादरीकरण, तर रात्री ८ ते ११ या वेळेत अवकाश दर्शन हा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे २३ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८ या वेळेत योगासन मार्गदर्शन, सकाळी १० ते १ या वेळेत नृत्य प्रशिक्षण ( एस. के. डान्स अकॅडमी ), सायं. ३ ते ५ या वेळेत पेपर क्राफ्ट (अर्चना गावडे व रुपाली कदम ), तसेच सायं. ५ ते ६ या वेळेत रंगोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन सुप्रिया संदीप मेत्री वित्त आणि महिला बालकल्याण समिती जि. प. सिंधुदुर्ग व गुरुनाथ रविकांत वर्देकर पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते होणार आहे.
अधिक माहितीसाठी अनुप वारंग ९८२२३६१०३६ व नितीन पवार ९४०४९२१७७७ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या समर कॅम्पमध्ये परिसरातील जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
