⚡दोडामार्ग ता.२०-: पिकुळे तिठा ते उसप या मुख्य रस्त्याच्या कामात झालेली दिरंगाई व निकृष्ट दर्जाबाबत उसप येथील ग्रामस्थांनी सोमवारी तीव्र आंदोलन छेडत उपोषण सुरू केले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून काम वेळेत पूर्ण न झाल्याने व दर्जा खालावल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून दर्जेदार काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उपोषणात देवू बाळू गवस, सुरेश विष्णू गवस, शंकर बाळाराम नाईक, रामा गोविंद धुरी, विठोबा नारायण नाईक, सखाराम नाईक, महादेव सुतार, विजय गवस, प्रकाश मोरजकर, वैभव विष्णू गवस, सुनील गवस, मनीष गवस, शैलेश गवस, अमोल मोरजकर, दिनेश नाईक आदी सहभागी झाले आहेत.
पिकुळे तिठा–उसप रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांचे उपोषण…
