कोळंब येथे विहिरीत पडलेल्या भटक्या कुत्रीला जीवदान…!
⚡मालवण ता.१८-:कोळंब लाडवाडी येथील सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या एका भटक्या कुत्रीला प्राणीमित्र आनंद बांबर्डेकर व स्वप्नील परुळेकर यांनी मोठ्या प्रयत्नांनी विहिरीबाहेर काढून जीवदान दिले. कोळंब लाडवाडी येथील विहिरीत एक भटकी कुत्री पडल्यावर तिला बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र कुत्रीला बाहेर काढणे शक्य झाले नाही. याबाबत मालवण मधील सामाजिक कार्यकर्त्या…
