⚡सावंतवाडी ता.१८-:
सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील रहिवाशी प्रसिद्ध गावठी वैद्य तथा सर्पमित्र रामा लक्ष्मण गावडे (85) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. गेली कित्येक वर्ष ते गावठी वैद्य म्हणून विविध आजारावर औषधे देत असत, महाराष्ट्र तसेच गोवा राज्यातून त्याच्याकडे औषधाराठी रुग्ण येत असत. सर्पमित्र म्हणूनही त्याची विशेष ओळख होती. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक सर्प पकडून त्यांना जीवनदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुलगे, सुना, विवाहीत मुली नातवडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
गावठी वैद्य व सर्पमित्र रामा गावडे यांचे निधन…
