यानिमित्त २० एप्रिल रोजी “शिव झाला मांगिरीश” नाटकाचे आयोजन..
⚡सावंतवाडी ता.१८-: सबनिसवाडा येथील श्री देव इस्वटी महापुरुष मंदिर चौथा शिखर कलशारोहण वर्धापनदिन सोहळा रविवार १९ एप्रिल रोजी संपन्न होत असून,यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ७:३० ते १२:०० श्री देव महापुरुष विद्या आणि सग्रह सौर याग ,दुपारी १२:३० ते ०१:०० महाआरती,दुपारी ०१:०० ते ०३:०० महाप्रसाद,सायं ०६:०० ते ०८:०० पालखी मिरवणूक सोहळा
तसेच रात्रौ ०९:०० ते १०:३० सुश्राव्य भजन कार्यक्रम होणार आहे.
तसेच या कार्यक्रमानिमित्त सोमवार दिनांक २० एप्रिल रोजी रात्रौ ९:०० वाजता श्री देवी माऊली दशावतार , इन्सुली यांचा ट्रिकसीनयुक्त ” शिव झाला मांगीरिश” हा नाट्यप्रयोग होणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव इस्वटी महापुरूष मंदिर समिती यांनी केले आहे.
