धाकोरे पावणादेवी ट्रस्ट च्या वतीने भाजपा माजी सरचिटणीस कविता मुळीक यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१८-: धाकोरे येथील श्री पावणादेवी वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला कविता मुळीक(घोडबंदर रोड. ठाणे मुंबई माजी बीजेपी सरचिटणीस) यांनी पावणादेवी वर्धापन दिनाला उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.
यावेळी सौ.मुळीक यांचा श्री पावणादेवी ट्रस्ट धाकोरे व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कार प्रसंगी सौ.मुळीक यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी तसेच गावाच्या विकासाठी लागणारे सहकार्य आपण करणार असल्याचे सांगून सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी श्री. पावणादेवी ट्रस्ट चे अध्यक्ष सागर मुळीक, सचिव सुनिल मुळीक, खजिनदार निलेश मुळीक, अशोक मुळीक, जयवंत मुळीक, अर्जुन मुळीक, संजय मुळीक, सुनिल मुळीक
सरपंच. रोहिणी मुळीक, माजी पंचायत समिती सदस्य (कुडाळ) मधुरा राऊळ,निलेश मुळीक तसेच ट्रस्ट चे सदस्य ,ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page