जिल्ह्यात आज आणखी 455 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १४ हजार 214 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5,हजार 445 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 455 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील जनतेच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी…

संदेश पारकर यांची पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी *💫कणकवली दि.१६-:* सर्व प्रकारच्या व्यापारासाठीची वेळ वाढवून मिळावी तसेच तौक्ते वादळामुळे जिल्ह्यातील जनतेची जी काही हानी झाली आहे त्याची त्वरीत नुकसान भरपाई मिळावी. जिल्हासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन अधिक प्रमाणात उपलब्ध करुन मिळाव्यात अशा विविध मागण्या शिवसेना नेते संदेश पारकर यांनी पालकमंत्री उदय सामंत…

Read More

रोटरी क्लब कणकवली व नगरपंचायततर्फे कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर प्रदान

*💫कणकवली दि.१६-:* रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या महिला रोटरीयन आणि साज ग्रुप कणकवलीने सामाजिक बांधिलकी जोपासत कणकवली नगरपंचायतच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत कोव्हीड केअर सेंटरला 2 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान केले . नगरपंचायत च्या वतीने कोव्हीड बाधित रुग्णांसाठी पूर्णतः मोफत कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हीड केअर सेन्टरमध्ये ऑक्सिजन बेड रुग्णाना…

Read More

बिडवाडी, करंजे गावाला ला तौक्ती वादळाचा मोठा फटका ;..

घरांच्या छप्परांचे नुकसान_ *💫कणकवली दि.१६-:* तौक्ती वादळाने कणकवली तालुक्याला मोठा फटका बसला आहे.सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने कणकवली तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले.बिडवाडी गावतील संजय विशांत घाडी यांच्या संपूर्ण घराच्या छप्पराचे सिमेंट पत्रे वादळी वाऱ्यात फुटून उडून गेले. या वादळात घाडी यांचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर करंजे गावालाही वादळी वाऱ्याचा फटका बसला….

Read More

कणकवली आचरा रस्त्यावर वडाचे झाड पडून रस्ता बंद

*💫कणकवली दि.१६-:* तौक्ती वादळाच्या वादळी वाऱ्याने कणकवली आचरा रस्त्यावर कलमठ येथे दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वडाचे झाड पडून रस्ता बंद झाला आहे. रोहित चिंदरकर यांच्या स्पाइस किचन चायनीज सेंटर समोरच वडाचे झाड उन्मळून पडले. यात विजेच्या पोल आणि विजवाहिन्या ही तुटून पडल्या. वडाचे झाड पडल्यामुळे कणकवली – आचरा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.

Read More

*चक्रीवादळात झालेल्या नुकसान भरपाईची उद्धव ठाकरेंकडे करणार मागणी

*पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती* *💫सिंधुदुर्ग दि.१६-:* सिंधुदुर्गात सुरू झालेल्या चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर पाऊस संपल्यावर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मला द्यावे, ते मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी करेन, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीसह सिंधुदुर्गात सुरू झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर झूम अँपद्वारे घेतलेल्या पत्रकार…

Read More

कुडाळ हिंदू कॉलनी येथे विद्युत पोलवर झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित…

कुडाळ : काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या वादळ व पावसामुळे कुडाळ हिंदू कॉलनी येथील साई मंदिर येथे विद्युत पोलवर झाड कोसळले. काल (शनिवार) मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार वादळ व पावसास सुरुवात झाली. दुपारपासून तर कुडाळ तालुक्यात वादळाचा वेग।अतिशय वाढला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड चालू झाली आहे. कुडाळ हिंदू कॉलनी येथील साई मंदिर येथे विद्युत पोलवर…

Read More

चक्रीवादळामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 40 घरांचे नुकसान…

वैभववाडी तालुक्यास सर्वाधित फटका… *💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत एकूण 40 घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 2 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. 31 ठिकाणी झाडे पडली असून 3 शाळांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली आहे. या वादळाचा सर्वाधित फटका आतापर्यंत वैभववाडी तालुक्याला बसला आहे. वैभववाडी तालुक्यात एकूण 27 घरांचे…

Read More

*मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे पावलू ट्रॅव्हल्स ला अपघात

एक जण ठार झाल्याचे वृत्त *💫ओरोस दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे पावलू ट्रॅव्हल्स ला भीषण अपघात झाला असून, या अपघातात एकजण ठार झाल्याचे वृत्त आहे. परंतु याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

Read More

*मुसळधार पावसाचा सावंतवाडी नगरपालिकेला तडाखा

बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे छप्पर कोसळले* *💫सावंतवाडी दि.१६-:* नगरपालिकेचे बॅरिस्टर नाथ पै ला मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून, या सभागृहाचे छत कोसळून खाली पडले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण किनारपट्टीवर धडकले ल्या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा सावंतवाडी शहराला बसला आहे.

Read More
You cannot copy content of this page