मळेवाड येथे १ ते ५ मे रोजी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.३०-: युवा मित्र मंडळ व ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १ मे ते मंगळवार ५ मे पर्यंत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मळेवाड जकात नाका येथे करण्यात आले आहे.
या महोत्सवात शुक्रवार १ मे रोजी दुपारी “श्री सत्यनारायण महापूजा “, सायंकाळी ७ वाजता स्थानिक भजने तसेच रात्रौ ८:३० वाजता निमंत्रित बाल गायकांची भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत गायन स्पर्धा.

शनिवार २ मे रोजी, सकाळी ९ वाजता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिर,दुपारी २:३० वाजता महिलांसाठी “हळदी कुंकू “कार्यक्रम, रात्रौ ८:३० वाजता कै. आना मेस्त्री ग्रुप ,नेरूर यांचा ” “नेरूर चा शिमगोत्सव ” कार्यक्रम.खास आकर्षण हालते मनमोहक चित्र रथ.

रविवार ३ मे रोजी रात्रौ ९ वाजता “मळेवाड सांस्कृतिक महोत्सव” शुभारंभ. रात्रौ ९:३० वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिकांची वेशभूषा ,रेकॉर्ड डान्स व इतर सांस्कृतिक कार्यक्रम.

सोमवार ४ मे रोजी, रात्रौ ९ वाजता कार्यक्रम शुभारंभ,उद्घाटन, रात्रौ ९:३० वाजता देवगड किंजवडे येथील ” प्रसिद्ध समई नृत्य कलाविष्कार”, रात्रौ १० वाजता “चिमणी पाखर” कुडाळ ग्रुप चा “जलवा” नृत्याविष्कार.

मंगळवार ५ मे रोजी ९ वाजता कार्यक्रम शुभारंभ, रात्रौ ९ :३० वाजता” कोकण सुंदरी २०२६ ” सौंदर्य स्पर्धा व लहान मुलांची “लिटल चॅम्प २०२६ ” सौंदर्य स्पर्धा होणार असून
या सांस्कृतिक महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन युवा मित्र मंडळ व ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरे यांच्या वतीने करण्यात आले आहे

You cannot copy content of this page