*💫कणकवली दि.१६-:* रोटरी क्लब कणकवली सेंट्रलच्या महिला रोटरीयन आणि साज ग्रुप कणकवलीने सामाजिक बांधिलकी जोपासत कणकवली नगरपंचायतच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत कोव्हीड केअर सेंटरला 2 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर प्रदान केले . नगरपंचायत च्या वतीने कोव्हीड बाधित रुग्णांसाठी पूर्णतः मोफत कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हीड केअर सेन्टरमध्ये ऑक्सिजन बेड रुग्णाना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा आवश्यक असेल त्यांच्यासाठी रोटरी क्लब कणकवली च्या महिला रोटरीयन आणि साज ग्रुप कणकवली च्या वतीने 2 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी रोटरी क्लब कणकवली च्या महिला रोटरीयन मेघा गांगण, दिशा अंधारी, वर्षा बांदेकर, राजश्री रावराणे, सुप्रिया नलावडे, सोनू मालविया, साज ग्रुपच्या सायली मालंडकर, लीना काळसेकर, साक्षी वाळके यांच्यासह गटनेता संजय कामतेकर, आरोग्य सभापती अभि मुसळे,महिला बालविकास सभापती प्रतीक्षा सावंत, नगरसेवक बाबू गायकवाड, ऍड.विराज भोसले, कविता राणे आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब कणकवली व नगरपंचायततर्फे कोविड केअर सेंटरला ऑक्सिजन सिलेंडर प्रदान
