घरांच्या छप्परांचे नुकसान_
*💫कणकवली दि.१६-:* तौक्ती वादळाने कणकवली तालुक्याला मोठा फटका बसला आहे.सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाने कणकवली तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले.बिडवाडी गावतील संजय विशांत घाडी यांच्या संपूर्ण घराच्या छप्पराचे सिमेंट पत्रे वादळी वाऱ्यात फुटून उडून गेले. या वादळात घाडी यांचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर करंजे गावालाही वादळी वाऱ्याचा फटका बसला. ग्रामपंचायत समोरील घराच्या छप्पराचे पत्रे उडून गेले.
