*💫कणकवली दि.१६-:* तौक्ती वादळाच्या वादळी वाऱ्याने कणकवली आचरा रस्त्यावर कलमठ येथे दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास वडाचे झाड पडून रस्ता बंद झाला आहे. रोहित चिंदरकर यांच्या स्पाइस किचन चायनीज सेंटर समोरच वडाचे झाड उन्मळून पडले. यात विजेच्या पोल आणि विजवाहिन्या ही तुटून पडल्या. वडाचे झाड पडल्यामुळे कणकवली – आचरा रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.
कणकवली आचरा रस्त्यावर वडाचे झाड पडून रस्ता बंद
