*पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*💫सिंधुदुर्ग दि.१६-:* सिंधुदुर्गात सुरू झालेल्या चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर पाऊस संपल्यावर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मला द्यावे, ते मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी करेन, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीसह सिंधुदुर्गात सुरू झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर झूम अँपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.
