जि.प.शाळा आशिये येथे शाळा पुर्व तयारी उपक्रम उत्साहात साजरा…

⚡कणकवली ता.३०-:
जि.प. शाळा आशिये येथे शाळा पूर्वतयारी उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात, टाळ्यांच्या कडकडाटात तसेच आनंदी स्वागत गीतांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, गाणी, गोष्टी सांगणे, चित्रकला, नृत्य तसेच मनोरंजक शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेतील वर्गखोल्या, ग्रंथालय, खेळाचे मैदान तसेच शाळेतील विविध सुविधा यांची माहिती करून दिली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या शाळेबद्दल आनंद आणि उत्सुकता दिसून येत होती.
यावेळी पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पाल्यांना प्रोत्साहन दिले. शिक्षकांनी पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपुलकी, आत्मीयता व शिक्षणाबद्दल गोडी निर्माण झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.निधी पुजारे, मुख्याध्यापक सौ.शिल्पा सावंत, सौ. वृषाली मसुरकर ,सौ.स्नेहा सामंत, सतीशकदम ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय बाणे,सौ.प्रिया पांचाळ, रोहीणी कदम,सौ.कुबल,सौ. ठाकुर, अंगणवाडी शिक्षिका तनया बाणे,सौ.कासले आदी मान्यवर,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page