⚡बांदा ता.३०-: बांदा येथील जागृत श्री देव पाटेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, दिनांक ४ मे रोजी हा धार्मिक सोहळा पार पडणार असून भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन पोलिस ठाणे, बांदा येथील कर्मचारी वृंदाच्या वतीने करण्यात आले आहे. या महापूजेचे निमंत्रक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आहेत. कार्यक्रमाचे स्थळ श्री देव पाटेश्वर मंदिर, पोलीस स्टेशन बांदा येथे आहे.
याच दिवशी सायंकाळी ठीक ७ वाजता श्री वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा ‘भ्रूगश्री अवतार’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगड घालणाऱ्या या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
बांदा पाटेश्वर मंदिरात ४ मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा…
