गोवेरीच्या सत्पुरुष आणि भराडीदेवीचा उद्या जत्रोत्सव…

कुडाळ : गोवेरीचे ग्रामदैवत श्री देव सत्पुरुष व श्री देवी भराडीचा वार्षिक जत्रोत्सव 8 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी दहा वाजल्यापासून ओटी भरणे, नवस बोलणे – फेडणे, रात्री 10 वाजता श्रींचा पालखी सोहळा, त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे, उपस्थित रहण्याचे आवाहन श्री देव सत्पुरुष देवी भराडी देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात…

Read More

वाफोली येथे कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

बांदा/प्रतिनिधीशेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी सोडवून त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वाफोली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. हा मेळावा सहयोगी अधिष्ठाता डॉ. वि. वि. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात पार पडला.मेळाव्यात तांत्रिक अधिकारी, क्षेत्रीय…

Read More

रवळनाथ मंदिर परिसरात हायमास्ट दिव्याचे लोकार्पण…

⚡सावंतवाडी ता.०७-: श्री देव रवळनाथ मंदिराकडील हायमामास्टचे उद्घाटन हर्षद गावडे यांच्या हस्ते गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. आपल्या गावात हायमास्ट मिळावा यासाठी भाजप प्रणित श्री देव रवळनाथ मित्र मंडळाने मिळून पाठपुरावा करत, जिल्हा नियोजनमधून हायमास्ट मंजूर करून घेतला.शेवटी प्रत्यक्ष स्वरूपात त्याची उभारणी होऊन त्याचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

Read More

मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन सि. ए परीक्षेत कोल्हापूर विभागामधून प्रथम..!

⚡मालवण ता.०७-:दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंटस् (सीए) च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला असून कोल्हापूर विभागामधून मालवणचे सुपुत्र आसिम सादिक मेमन याने प्रथम क्रमांक पटकविला आसीम सादीक मेमन हे मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून मालवणच्या भारत जनरल स्टोअर्सचे मालक व ज्येष्ठ व्यापारी सादीक दादापे मेमन यांचे चिरंजीव तर मसूद दादापे…

Read More

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन साजरा…

⚡कुडाळ ता.०७-: वंदे मातरम या गीताला प्रकाशित होऊन १५० वर्षे पूर्ण झाली, या पार्श्वभूमीवर वंदे मातरम गीताचा १५०वा वर्धापन दिन 7 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.यावेळी प्राध्यापक अरुण मर्गज यानी वंदे मातरम गीताचा १५० वा वर्धापन दिन का आपण…

Read More

*पालकमंत्री नितेश राणेंचा शनिवार ८ रोजी नागरी सत्कार…

पालकमंत्री नितेश राणे यांनी वाडी वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याच्या निर्णयामुळे समाधान:संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग करणार सत्कार.. ⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह््यातील १९२ वाडीवस्त्यांची व २५ रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून घेण्यात आला. या निर्णयामुळे जातीवाचक वाडीवस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलेला देशातील पहिला जिल्हा सिंधुदुर्ग ठरला आहे. या निर्णयाची दिल्लीपर्यंत दखल…

Read More

सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामास ४ कोटींची शासन मान्यता…

सावंतवाडी : जिल्हा कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या सुमारे ४ कोटी ५ लक्ष ८० हजार २१६ रुपये एवढया रकमेच्या कामास राज्य शासनाच्या गृह विभागाकडून प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली आहे‌. माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांच्या सुचनेनुसार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी तसा परीपुर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह दिला होता. त्यास मंजूरी मिळाली आहे,…

Read More

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी दि.०७-: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका -2025 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. जिल्ह्यातील 3 नगर परिषदेसाठी (सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला) आणि 1 नगर पंचायत (कणकवली) साठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती…

Read More

महिमा मोहितेची राज्यस्तरावर झेप; विभागीय स्पर्धेत तिन्ही प्रकारात सुवर्णहॅट्रिक…!

⚡मालवण,ता.०७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये महिमा मोहिते हिने १०० मीटर, २०० मीटर धावणे व लांब उडी या तिन्ही प्रकारात निर्विवाद वर्चस्व गाजवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीच्या जोरावर तिने डेरवण, चिपळूण (रत्नागिरी) येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत थरारक…

Read More

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत ‘हे चांदणे फुलांनी…’ या सुरेल कार्यक्रमाची धमाल…

⚡सावंतवाडी ता.०७-: श्री सद्गगुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजप नेते श्री विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून सलग आठव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती- संकल्पनेतून हे चांदणे फुलांनी…. जुन्या नव्या हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा या संगीत कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर…

Read More
You cannot copy content of this page