अस्तित्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तू वाटप

*⚡कणकवली दि.१२-:* सामाजिक बांधिलकी अन् समाज भावना जपत अस्तित्व प्रतिष्ठान (रजि.) मुंबईच्या माध्यमातून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना स्टिलच्या टाक्या, बादल्या, प्लॅस्टिकचे डब्बे, ब्लँकेट, टॉवेल, चटई, गाऊन, सॅनिटरी पॅड, अन्न धान्य तसेच काही भांडी अन् बिस्किट अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच प्रतिष्ठान कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले. कोकणात महाप्रलयकाळी पावसाने हाहाकार माजवून पुरस्थिती निर्माण झाल्यांने तसेच दरड दुर्घटनेमुळे…

Read More

दारूवर स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई

कलंबिस्त येथे दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरविणाऱ्यावर कारवाई *⚡सावंतवाडी ता.१२-:* स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कलंबिस्त येथे गोवा बनावटीची दारूवर कारवाई करत दारू विकणाऱ्या महिलेसह दारू पुरवणाऱ्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. फातिमा लॉरेन्स फर्नांडिस वय…

Read More

वेंगुर्लेत अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई

३१ हजार ६०० मुद्देमाल जप्त *⚡वेंगुर्ला दि.११-:* तालुक्यात पोलिसांनी गस्ती दरम्यान तापसणी करताना तीन अवैध गोवा बनावटीच्या दारूवर मंगळवारी (१० ऑगस्ट) कारवाई केली यात सुमारे ३१ हजार ६०० रुपयांच्या गोवा बनावटी दारू सहित दोन दुचाकी वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून 3 दुचाकी स्वरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सातार्डा शिरोडा मार्गे अणसुरकडे जाणाऱ्या…

Read More

चाकोरीबाहेरील शिक्षणातून ध्येय निश्चित करा : सतीश सावंत

भिरवंडे ग्रा.प.तर्फे गुणवंत्ताचा सत्कार *⚡कणकवली दि.११-:* दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवत त्यादृष्टीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. चाकोरीबाहेरील अभ्यासक्रम, स्पर्धात्मक परीक्षा यातून उच्च दर्जाच्या नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येक मुलाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, असे आवाहन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. भिरवंडे ग्रामपंचायतींच्यावतीने आयोजित दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींच्या विशेष…

Read More

धक्का मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरात सत्तर रक्तदात्यांनी घेतला सहभाग

डॉ.कपिल मेस्त्री च्या हस्ते झाले उद्घाटन मालवण दि प्रतिनिधी ओरोस येथील शासकीय रक्तपेढीची रक्ताची मागणी लक्षात घेऊन धक्का मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चौथ्या रक्तदान शिबिराचे उदघाटन मालवणचे डॉ कपिल मेस्त्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि मालवणच्या हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरात ७० रक्त दात्यांनी सहभाग घेतला. मालवणच्या सामाजिक…

Read More

तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई न मिळाल्यास भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा इशारा मालवण दि प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना जाहीर झालेली मदत ही फक्त २० टक्के नुकसानग्रस्तांनाच मिळाली आहे. चक्रीवादळात नुकसाग्रस्तांचे पंचनामे तयार करताना प्रशासनाने आमदार वैभव नाईक यांच्या दबावाखाली काम केले. आम. नाईक हे प्रशासनावर दबाव आणून आपल्या सोयीचे राजकारण करून केवळ आपल्या माणसांची कामे करत आहेत, त्यामुळे शिवसेनेशी संबंधित असणाऱ्यांना…

Read More

कुडाळातून निलेश राणेंनी निवडणूक लढवावी

भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची कार्यकर्त्यांच्यावतीने मागणी मालवण दि प्रतिनिधी भाजपचे नेते दत्ता सामंत यांना शिवसेनेत येण्यासाठी आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र दत्ता सामंत यांनी आपण नारायण राणे यांचे कार्यकर्ते असल्याने त्यांना सोडून आपण कुठे जाणार नाही असे त्यांना सांगितले होते. तसेच दत्ता सामंत यांनी आपण कोणतीही निवडणूक…

Read More

शहरात पोलिसाची नाकाबंदी

विनामास्क आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई *⚡सावंतवाडी ता.११-:* शहरात पोलिसांनी आज सायंकाळी अचानक नाकाबंदी केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. स्वतः पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी मैदानात उतरून विनामास्क फिरणाऱ्यावर तसेच हॉटेल व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान यापुढे नियम न पाळल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा ही निरीक्षकांनी दिला आहे. यावेळी वाहतूक पोलीस…

Read More

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे झंजावाती नियोजन दौऱ्याचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा बैठकांची जोरदार सुरुवात

*⚡कणकवली दि.११-:* कोकणचे नेतृत्व ना. नारायणराव राणे यांची जन आशीर्वाद यात्रा १९ ते २६ ऑगस्ट या काळात मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत निघत आहे. या झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाला मिळालेले केंद्रीय मंत्रीपद, रोजगाराच्या क्षेत्रात कोकणच्या बेरोजगारांना उभे करू शकण्याची क्षमता असणारे मध्यम, लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालय आणि कोकणातील सध्याची राजकीय स्थिती पाहता ही यात्रा प्रचंड जोशात…

Read More

केदार जामसंडेकर स्मृतीदिनानिमित्त १७ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

*⚡मालवण दि.११-:* स्व.केदार जामसंडेकर स्मृतीदिना निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तदान, देहदान, अवयवदान आणि रुग्णमित्र या क्षेत्रातील अग्रेसर संस्था , सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार दि. १७ आॕगष्ट २०२१ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात जाणवणारा प्रचंड रक्त तुटवडा लक्षात घेता तरुण…

Read More
You cannot copy content of this page