डॉ.कपिल मेस्त्री च्या हस्ते झाले उद्घाटन
मालवण दि प्रतिनिधी ओरोस येथील शासकीय रक्तपेढीची रक्ताची मागणी लक्षात घेऊन धक्का मित्रमंडळाने आयोजित केलेल्या चौथ्या रक्तदान शिबिराचे उदघाटन मालवणचे डॉ कपिल मेस्त्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि मालवणच्या हॉटेल अतिथी बांबूचे मालक संजय गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरात ७० रक्त दात्यांनी सहभाग घेतला. मालवणच्या सामाजिक क्षेत्रात नव्याने कार्यरत असलेल्या धक्का मित्रमंडळाने गेल्या काही महिन्यापासून ओरोस रक्तपेढीची गरज लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचा धडाका लावला आहे. आज दैवज्ञ भवन येथे झालेल्या रक्तदान शिबिरात युवक युवतींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग दर्शवला. कोरोना व्हायरसमुळे रक्ताची आवश्यकता भासत असल्याने तसेच लॉकडाऊन मुळे रक्तदान शिबिरे होत नसल्याने रक्ताची समस्या भेडसावू लागली आहे आणि म्हणूनच धक्का मित्रमंडळाने घेतलेल्या ह्या शिबिराविषयी सर्वांनी कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कपिल मेस्त्री, डॉ. प्रफुल्ल साळुंखे, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, मुख्याधिकारी संतोष जिरगे, मुकेश बावकर, प्रसाद आचरेकर, कैलास ढोले, हेमंत शिरगावकर, बाबू डायस, संजय गावडे, गौरेश कांबळी, देवदत्त तोडणकर, भूषण पिसे, रोहित चव्हाण, विकास पांचाळ, आदिती रेवंडकर, मयु पारकर आदी व इतर उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी निलेश जाधव, रोहित चव्हाण, नितीन कोटियान, आशीष घाडीगांवकर, अनिकेत मयेकर, अनिकेत चव्हाण, छाया कांबळी, ललित चव्हाण, मनीष कांबळी, सुरेश नायडू, भालचंद्र आपकर, अस्लम अथनिकर, प्रज्ञेश चव्हाण आदींनी अथक परिश्रम घेतले.
